‘एटीएम’मध्ये अडकला मेकॅनिक

0

टेक्सास पोलिसांना मदतीची हाक आली पण ती इकडून तिकडून नाही तर चक्क एटीएममधून. नोटांऐवजी एटीम मशिनमधून मला वाचवा मी आत अडकलोय अशी चिठ्ठी बाहेर आली. त्यावर कृतीकरीत पोलिसांनी एटीएमला जोडलेल्या मागील रूममधून मॅकेनिकला सोडवला.

बँक ऑफ अमेरिकेच्या कार्पस ख्रिस्ती शाखेतील एटीएममधून मला मदत करा. मी आत अडकलोय. माझा फोन माझ्याकडे नाही. माझ्या बॉसला फोन करा. पोलिस अधिकारी रिचर्ड ओल्डनला एटीएममधून अशी नोट बाहेर आलेली दिसली. सुरूवातील त्याला वाटले कुणीतरी ही मस्करी करतेय. पण त्याला एटीएममधून क्षीण आवाजही ऐकू आला. पोलिसांनी मग हालचाल सुरू केली आणि एटीएम रूममध्ये प्रवेश करून मेकॅनिकची सुटका केली.

मेकॅनिक एटीएम रूममध्ये लॉक दुरूस्तीसाठी गेला होता. ते दुरूस्त झाले पण त्यामुळे तोच खोलीत अडकला. त्याचा मोबाईलही गाडीतच राहिला होता. आता एकच पर्याय होता तो म्हणजे एटीएममधून नोटेऐवजी संदेश पाठवणे. त्याने अनेकदा चिठ्ठी पाठवली पण आधी आलेल्या ग्राहकांना कुणीतरी गंमत करतेय असे वाटले. पोलिसांनी चिठ्ठी गांभीर्याने घेतली नसती तर मोठी आपत्ती ओढवली असती…