एटीएममध्ये पुन्हा एकदा रोख रकमांचा खडखडाट

0

मुंबई। नोटबंदीनंतर आता पुन्हा एकदा एटीएममध्ये चलन तुटवड्यामुळे खडखडाट पाहायला मिळत आहे. यात सर्वसामान्या नागरीकांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहे. गेल्या पंधरवाड्यापासून होत असलेल्या या अडचणी होत असतांना दरम्यान अनेक सण व उत्सवानिमित्त सुटी येत असल्याने अजून अडचणींमध्ये भर निर्माण झाले आहे. चलनाचा पुरवठा रिझर्व्ह बँकेकडून कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून एटीएम रिकामे झालेले दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेकडून मागणीच्या तुलनेत केवळ 25 टक्के चलनाचा पुरवठा होत असल्यामुळे ही चलन टंचाई जाणवत असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. ही टंचाई महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये
सर्वाधिक आहे.

टंचाईची झळ ग्रामीण भागालाही
चलन टंचाईमुळे शहरभागासोबत ग्रामीण भागालाही फटका बसत आहे. तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पुर्वेकडील पश्चिम बंगाल, ओडीशामध्ये चलनाचा मोठा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्या राज्यात चलनाची टंचाई नाही. त्यातच आता शुक्रवारी आणि रविवारी बँका बंद असल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. राज्यातील निवडणुकांमुळे रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये रोख रकमेचा पुरवठा सर्वाधिक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये रोख रकमेचा पुरवठा केला जात आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे.