जळगावसह नागपूर व बडोद्यातील लुटीचा आकडा तब्बल 50 लाखांवर
भुसावळ– भुसावळसह किनगाव व धानोर्यात एटीएम फोडून बडोद्यात उच्छाद मांडणार्या एटीएम चोरट्यांच्या तपासासाठी बडोदा गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी भुसावळात भेट दिली. शहर पोलीस ठाणे हद्दील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील अॅक्सीस बँकेच्या एटीएमची पथकाने पाहणी करीत डमडाटा (चोरी होत असलेल्या काळातील सेल लोकेशन) घेतला तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली जीप म्युन्सीपल पार्क भागातून चोरण्यात आल्याने या भागातही जावून पथकाने माहिती जाणून घेतल्याचे समजते.
एटीएम चोरीतील लूट पोहोचली तब्बल 50 लाखांवर
गॅस कटरने अलगद एटीएम फोडणार्या चोरट्यांनी 12 जानेवारी रोजी पुन्हा नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथील गुमगाव मार्गावरील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दोन एटीएम फोडून चोरट्यांनी 19 लाख 73 हजार 400 रुपयांची रक्कम लांबवली होती शिवाय दोन महिन्यांपूर्वी याच बँकेच्या एटीएममधून दहा लाखांची रोकड लांबवण्याची घटना उघड झाली आहे. त्यानंतर रविवार, 14 रोजी भुसावळच्या पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील अॅक्सीसच्या एटीएममून तीन लाख 14 हजार 100 रुपये तर किनगावच्या टाटा इंडिकॅशच्या एटीएममधून 75 हजार तसेच धानोर्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून तीन लाख 63 हजार 100 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. यानंतर चोरट्यांनी भुसावळातील चोरीच्या वाहनाद्वारे बडोदापर्यंत प्रवास केला शिवाय या वाहनाची नंबरप्लेटही बदलली तर बडोद्यातील तब्बल सहा एटीएम फोडून त्यातील 14 लाख 82 हजारांची रोकड लंपास केल्याने आजवर झालेल्या चोर्यांमध्ये सुमारे 50 लाखांची रोकड लंपास झाल्याने तपास यंत्रणांवरील ताण अधिक वाढला आहे. दरम्यान, या सर्व चोर्यातील हरीयाणातील टोळीने केल्याचाा पोलिसांना संशय आहे.