शहादा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहादा तालुका व परिसरातील नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे बँक शाखेत देखील येणारे जे ग्राहक आहेत. त्याना एक एक मीटर सर्कल करुन देण्यात आले असुन येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास बँक कर्मचारी सुरुवातीसच सॅनिटायझर टाकुन त्याना आत प्रवेश देत आहेत. ग्राहकातील अंतर सुरक्षित ठेवले जात असुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. शिवाय पैसे काढले जाणारे एटीएम मशिनवर तश्याच प्रकारे नियोजन करण्यात आले असुन एटीएम मशीनमध्ये प्रवेश करताना त्याचप्रमाणे काळजी घेतली जाते. एटीएम मशीन सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु असते. त्यावेळी तेथील कर्मचारी सातत्याने काम करत असुन ते सर्व ग्राहकांची काळजी घेतात. शिवाय प्रत्येक तासाला मशिन साफ केले जात असल्याची माहिती बँक मॅनेजर श्रीधर मुरलीधर राऊत यानी दिली. त्यांचा या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.