एनडीआरएफची पूरस्थिती हाताळण्यासाठी देशात ७१ ठिकाणी पथके

0
नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे देशाच्या काही भागांत गंभीर पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यातून पूरस्थितीवर हाताळण्यासाठी आणि मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) ९७  पथके देशातील ७१  ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. त्या पथकांमध्ये सुमारे 4 हजार 500 जवानांचा समावेश करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीवेळी एनडीआरएफची पथके प्रभावीपणे मदत आणि बचाव कार्ये पार पाडत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पावसाळी सुरू होताच केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने पाऊले उचलून 14 राज्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये साधारणपणे 45 जवान आहेत. याशिवाय, सावधगिरीचे पाऊल म्हणून एनडीआरएफची आणखी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
गरजेनुसार त्यांना विविध ठिकाणी पाठवण्यात येईल. एनडीआरएफचे दिल्लीतील नियंत्रण कक्ष दिवसाचे चोवीस तास स्थितीवर देखरेख ठेऊन आहे. भारतीय हवामान खाते (आयएमडी), केंद्रीय जल आयोग (सीडब्लूसी) आणि इतर यंत्रणांशी एनडीआरएफ सातत्याने संपर्क ठेऊन आहे. अलिकडेच महाराष्ट्राचा पालघर परिसर जलमय झाला. त्यावेळी एनडीआरएफच्या पथकांनी नालासोपाऱ्यात 411 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.