एनसीएलमध्ये भीषण आग

0

पुणे – पाषाण येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या (एनसीएल) एका इमारतीला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली.

संस्थेत मिथेनॉलची दोन मजली लॅब असून येथे छोट्या स्वरूपाचे संशोधन केले जाते. कॉम्प्युटर, मशीनरी तसेच केमिकल लॅबमध्ये ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी अचानक नऊच्या सुमारास आग लागली. ही आग काही वेळातच भडकली. येथील कर्मचार्‍यांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. कोथरूड, पाषाण व सेंट्रलच्या एकूण पाच फायर गाड्या, दोन पाण्याचे टँकर आणि आधिकारी व कर्मचार्‍यांनी अर्ध्या ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे. यामध्ये मशीनरी, कॉम्प्युटर तसेच केमिकलही जळाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही.