जळगाव । मूळजी जेठा महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना युनिटच्या वतीने भारत स्वच्छता अभियान अंतर्गत 16 सप्टेबर पासून महाविद्यालयात एन.सी.सी. युनिट कडून स्वच्छता अभियान सप्ताह मोहीम हातात घेतली होती. त्या दरम्यान, 17 रोजी स्वच्छता कशी आणि का केली जाते ? या विषयावर एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश महाले यांनी स्मार्ट क्लास रूम, ह्युमिनिटी बिल्डिंग येथे झालेल्या कार्यक्रमात एन.सी.सी. च्या छात्र सैनिकांना मार्गदर्शन केले. या वेळी कलाशाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ एस. एन. तायडे, लेफ्टनंट डॉ. बी.एन.केसुर, लेफ्टनंट प्रा.योगेश बोरसे हे उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
20 सप्टेंबर रोजी एन.सी.सी. च्या छात्र सैनिकांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत स्थित स्वर्गीय मूळजी जेठा यांचा पुतळा स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यानी अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. तसेच महाविद्यालय परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता करून विद्यार्थ्यांमध्ये भारत स्वच्छता अभियानाबाबत जागृती करून दिली. या वेळी कलाशाखेचे उप प्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. तायडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.ए.पी.सरोदे, लेफ्टनंट डॉ. बी. एन. केसुर, लेफ्टनंट प्रा. योगेश बोरसे तसेच छात्र सैनिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे कौतुक
मू. जे. महाविद्यालयाच्या एन.सी.सी छात्र सैनिकांनी केलेल्या कार्याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी.कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले. या भारत स्वच्छता अभियानामुळे इतर नागरिकांना प्रोत्साहन मिळून वरिष्ठ नागरिक, पालकांकडून देखील या छात्र सैनिकांचे आणि महाविद्यालयाच्या युनिट चे कौतुक केले जात आहे. तर एनसीसीसीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील स्वच्छतेबाबत माहिती दिली. तर संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला. यातच पोस्टरद्वारे देखील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रचंड उपस्थिती होती.