जळगाव । विविध प्राधिकरणाच्या मतदार नोंदणीस मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे निवेदन सोमवारी कुलगुरू पी.पी. पाटील यांना नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एन्-मुक्ता) या प्राध्यापक संघटनेतर्फे देण्यात आले.सध्या विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. मतदार नोंदणी करतांना वेबसाईट वर अनेक वेळा संबंधीत लिंक खुली होत नव्हती अथवा ती लिंक मध्येच बंद पडत होती. इंटरनेट बंद पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. प्राचार्य, विभाग प्रमुख प्राध्यापक आणि इतर प्राध्यापक यांना आपली नावनोंदणी करता आली नाही, मतदानापासून वंचित राहता येऊ नये म्हणून मतदारनोंदणीची मुदतवाढ द्यावी, असे निवेदन आले. कुलगुरूंनी सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळास दिले. एन्-मुक्ताचे अध्यक्ष प्रा.नितीन बारी, महासचिव डॉ.अविनाश बडगुजर, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रज्ञा जंगले व डॉ.पंकज नन्नवरे, प्रा.डॉ.किशोर पाठक, डॉ.के.पी.नारखेडे, प्रा.एस.जे.चंद्रात्रे, प्रा.पवन पाटील, प्रा.एन.जे.पाटील, डॉ.एस.डी.भैसे, डॉ.ए.एस.कोळी आदी उपस्थित होते.