एफआरपीपेक्षा प्रति टन उसाला 20 रुपये जादा भाव

0

संत मुक्ताई शुगर कारखान्याकडून उसाचे सुरळीत गाळप

मुक्ताईनगर- घोडसगाव येथील संत मुक्ताई शुगरने एफआरपीपेक्षा 20 रुपये जास्तीचा भाव देण्याची घोषणा केली असून गत पंधरवड्यात 360 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात एकरकमी एक हजार 800 रुपये प्रतिटन यानुसार बिल वर्ग झाल्याचे व्हा.चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी म्हणाल्या. मुक्ताई शुगर गाळप हंगामाला 29 ऑक्टोबरला सुरुवात झाल्यानंतर माजी मंत्री खडसेंनी एफआरपी पेक्षा 20 रुपये जास्त भावाची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या पंधरवड्यात 360 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात एफआरपी एक हजार 1780 अधिक जास्तीचे 20 रुपये असे 1800 प्रतीटन बिल वर्ग करण्यात आले. या शेतकर्‍यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत ऊस दिलेला होता. दरम्यान, मशीन दुरुस्ती व आधुनिकीकरणामुळे चालू हंगामात कारखाना दररोज 3200 ते 3300 टन ऊसाचे गाळप करत आहे. यासोबतच सह वीजनिर्मिती प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने सुरू आहे. 5 डिसेंबरपर्यत कारखान्याने उच्चांकी गाळप केल्याचे मुख्य अभियंता तुकाराम सुरवले, गोपाळ पाटील, रवि भोसले, अमृत देवरे, केशव पाटील, गजानन जाधव, हणमंत कांगणे म्हणाले.