एमआयटीच्या विद्यार्थ्यांचे यश

0

पुणे । सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनिअर्स इंडिया (एसएई) आणि एमएसआयएल यांच्या वतीने नवी दिल्लीतील ग्रेटर नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (बीआयसी) येथे आयोजित सुप्रा एसएई इंडिया 2017 या राष्ट्रीय फॉर्मुला स्टुडंट स्पर्धेत एमआयटी आणि एमआयटी सीओईच्या विद्यार्थ्यांची एक्सलरेसर्स टीमने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे तिसरे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 126 संघ सहभागी झाले होते. यामध्ये ऑटोक्रॉसमध्ये प्रथम, स्कीड पॅडमध्ये प्रथम आणि एक्सलरेसर्समध्ये सर्वसाधारण तृतीय असे एकूण चार पुरस्कार एमआयटीला मिळाले आहेत.