‘एमआयटी’तर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी नव्वद लाखांचा धनादेश

0

पुणे : केरळ पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे नव्वद लाख रुपयांचा धनादेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे प्रा. राहुल कराड व प्रा. प्रकाश जोशी यांनी केरळ विधानसभेचे सभापती पी. श्रीरामकृष्णन यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.

यावेळी नानिक रूपानी, गायत्री कराड, प्राचार्य डॉ. बी. एस. कुचेकर, प्राचार्या डॉ. आर. एस. काळे व प्राचार्य डॉ. ए. एस. हिवाळे उपस्थित होते.

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, देशात जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा एमआयटी पुढाकार घेऊन मदत करीत असते. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून संस्था सदैव कार्य करीत आहे. किल्लारी, ओरिसा, गुजरात, नेपाळ या ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी संस्थेने आपला खारीचा वाटा उचलला आहे. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 120 घरांची उभारणीही संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

प्रा. राहुल कराड म्हणाले, आपल्या देशातील सर्व नागरिक हे एकमेकांचे भाऊ आहेत. कोणत्याही आपत्तीच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे, असे आम्ही मानतो आणि आमच्या पातळीवर जे-जे करता येणे शक्य आहे, ते-ते सर्व आम्ही करीत असतो. यामध्ये संस्थेतील सर्व घटकांचे सहकार्य मिळत असते.