एमआयटीत संगीत महोत्सवाचे आयोजन

0

पुणे : माईस एमआयटीतर्फे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रविवार (दि.30) व सोमवार (दि.31) असे दोन दिवस सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत लोणीकाळभोर येथील विश्‍वशांती गुरुकुलमध्ये होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 6 वाजता सुप्रसिध्द शास्त्रीय गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांच्या हस्ते होणार आहे. या संगीत महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये, सुप्रसिद्ध गायिका श्रृति देवस्थळी आणि गोदावरी मुंडे या आपली कला सादर करतील. सोमवारी विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे विद्यार्थी, सुप्रसिध्द गायिका पौरवी साठे, नृत्यांगना प्रा. अबोली थत्ते, बासरी वादक अझरूद्दीन शेख व गायक उपेंद्र भट आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने होईल, अशी माहिती प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, ज्योती ढाकणे, आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.