एमआयडीसीतील प्लॉस्टीक कंपनीच्या कच्चा मालाची चोरी

0

जळगाव । जळगाव एमआयडीसीतील जे-सेक्टरमध्ये असलेल्या प्लॉस्टिक कंपनी असून या कंपनीतून प्लॉस्टिकच्या कच्या मालाच्या 100 गोण्या 1 लाख 20 हजार रुपये किमंतीचे माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 30 रोजी उघडकीस आली असून याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, नदीम मोहंमद अली सैय्यद (वय 34, रा.19 क खोटेनगर) यांचे एमआयडीसी परिसरात सेक्टर नं. जे 66 मध्ये गौरव केमप्लास्ट नावाची कंपनी आहे. या कंपनीत पी.व्ही.सी.पाईप तयार केले जातात. यासाठी त्यांनी 30 किलो वजनाचा कच्चा माल असा एकूण 8 ते 10 टन कच्चामाल कंपनीत ठेवला होता. 25 सप्टेंबर रोजी कामाची ऑर्डर नसल्यामुळे कंपनीतील 4 लोकांना सुटी देण्यात आली होती. 25 ते 30 दरम्यान कंपनी बंद असल्यामुळे कंपनीकडे कोणी गेले नाही. 30 रोजी नदीम सैय्यद सकाळी 10 वाजता भावासोबत गेले असता कंपनीतील 30 किलो वजनाच्या 100 गोण्या असा एकूण 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा माल नसल्याचे दिसून आले. याबाबत कंपनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चेक केले असता दोन महिन्यापासून ठेवण्यात आलेला माल अज्ञात व्यक्ती चोरून घेऊन जात असल्याचे समजले. त्यानुसार नदीम मोहंमद अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.