एमआयडीसीमधील चटई कंपनीला आग

0

जळगाव । शहरातील उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या एमआयडीसी मध्ये चटई कंपनीला शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याने खळबळ उडाली होती. व्ही 69 सेक्टर एमआयडीसी मध्ये चटई कंपनी मोठ्या परमनंट विस्तारली आहे. आग अचानक लागल्याने महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने चार पाण्याचे बंब घटना स्थळी दाखल झाले होते. नागरिकांनी धावपळ करीत आग विजवण्याच्या प्रयत्न केला.

अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍याच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आण्यास यश आले. आग लागली असता वेळेवर वीजवण्याचे प्रयत्न झाल्याने मोठे नुकसान होताना वाचले असल्याची माहिती चटई मालक महाजन यांनी दिली आहे. कंपनीमध्ये काम करणार्‍या कामगाराने वेळीच लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नुकसान झाल्याने कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.