एमआयडीसी आंदोलनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आले यश

0

चाळीसगाव । जानेवारीत स्थानिक बेरोजगारांच्या अनेकविध प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्थानिकांना रोजगार व 12 तासाची शिफ्ट बदलवून 8 तासावर करणे यासोबतच पगारवाढीबाबत कामगारांना योग्य तो न्याय मिळावा, अशा अनेकविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. शनिवारी 19 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी भारत वायर्स रोप कंपनीत जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली.

विविध केल्या मागण्या
यावेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक शिरीष हिरवे यांनी मागण्या मान्य केले असल्याचे सांगितले. कंपनीत स्थानिक रोजगारांना गरजेनुसार नोकरीस प्राधान्य देण्यात येणार असून कंपनीने एकूण 49 (मशीन ऑपरेटर) पदावर असलेल्या कामगारांना कंपनीच्या पे रोलवर घेण्यात आले आहे. तसेच उर्वरित कामगारांना ऑपरेटर पदासाठी परीक्षा व विभागीय तांत्रिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर कंपनीच्या ध्येयधोरणानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच कंपनीचे कामकाज तीन पाळीत करण्याची मागणी मंजूर करण्यात आली असून 12 तासाहून 8 तास कामकाजाचे स्वरुप असणार आहे.

यांची होती उपस्थिती
बाजारपेठेतील मागणीनुसार विभागानुसार कामगारांना ओव्हरटाईम दिला जाणार आहे, पात्रतेनुसार कंपनीतील कामगारांना पगारवाढ देण्यात येईल या आशयाचे लेखीपुर्तता पत्र कंपनीचे मुख्य व्यवस्थापक शिरीष हरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, तालुका उपाध्यक्ष गोकुळ कोल्हे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील कोतकर आदी उपस्थित होते.