जळगाव। औद्योगीक वसाहत परिसरातील जे-सेक्टर 90 येथील गोविंद कोलते फुड प्रॉडक्ट या कारखान्याला भरदिवसा दुपारी एक वाजता अचानक आग लागली. चिवडा तयार करण्याच्या या कारखान्यात बॉईलरसहीत इतर यंत्र सामुग्री आणि मालाचे पंधरा लाखांवर नुकसान झाले असुन या प्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे.
औद्योगीक वसाहत परीसरातील चिवडा व इतर खाद्यपदार्थ तयार करणार्या गोविंद कोलते फुडप्रॉडक्ट या कारखान्यात दुपारी जेवणाची सुटी झाली असतांना शॉटसर्कीट मुळे अचानक आगीचा भडका उडाला. आगीचे लोट उठताच कामगारांनी अग्निशामक दलास फोन केला, तसेच स्वत: खबरदारी घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न चालवले. महापालीकेच्या दोन अग्निबंबासहीत कारखान्यातील कामगारांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. लागलेल्या आगित जवळ पास पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज गोविंद कोलते यांनी व्यक्त केला असुन पोलिसात या प्रकरणी अकस्मीक आगीची नोंद केली आहे.