जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गुरांची अत्यंत निदर्यतेने व कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणार्या वाहनाला ताब्यात घेत एक लाख 28 हजार रुपये किंमतीच्या गुरांची सुटका केली. या प्रकरणी मेहरुणच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजजवळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना पिकअप व्हॅन (एम.एच.20 ई.जी.1691) मध्ये गुरांना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असतांना आढळून आले. गुरे वाहतुकीचा नसल्याने चालक शकील अहमद मसुद्दीन (32ग, मेहरूण, पिरजादे जळगाव) यास अटक करण्यात आली.
पोलिसांनी वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणून गुरांची सुटका करण्यात आली. सहाय्यक फौजदार वामन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार वाहन चालक शकील अहमद मसुद्दीन यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय पाटील करीत आहेत.