एमएम महाविद्यालयात जीएसटीवर परिसंवाद

0

पाचोरा। भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल करीत असतांना 1 जुलै पासून जी.एस.टी. प्रभावीपणे अंमलात आली आहे. याबाबत पाचोरा शहर व परिसरातील व्यापारी, उद्योगपती, घाऊक व किरकोळ विक्रेते, दुकानदार, पतसंस्था संचालक, सहकारी व राष्ट्रीयकृत बँका, पदाधिकारी, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाचोरा एम.एम. महाविद्यालयात 7 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिसंवादास तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. सोनाळकर, प्रा. पी.टी. चौधरी, स्मिता बाफणा जयेश ललवाणी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा पी.टी.सी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हि.टी. जोशी, मानद सचिव अ‍ॅड. देशमुख, व्यवस्थापन समितीचे चेअरमन एस.झेड. तोतला आदींची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन केले आहे.