पुणे : विविध सवलती आणि पर्यटकांना अधिक चालना दिल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नाताळ सणानिमित्त आयोजित केलेल्या आरक्षण सवलतीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला असून सर्व पर्यटन क्षेत्रांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. पर्यटकांनी कोकणाला सर्वाधिक पसंती दिली आहे. गेल्या काही वर्षांत बहुतांशी पर्यटकांनी धार्मिक स्थळांसह अन्य पर्यटनाच्या ठिकाणांनाही सर्वाधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच गैरफायदा घेऊन स्थानिक व्यावसायिकांनी त्यांच्या दरात वाढ केली होती. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी पर्यटकांसाठी निवासासह अन्य सर्व प्रकारच्या सुविधा देण्यास सुरुवात केली होती, पर्यटकांना पर्यटनाची माहिती व्हावी यासाठी गाईडही नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर अल्पदरात उच्च दर्जाच्या सुविधाही मिळत आहेत.