एमपीएससीच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार

0
मुंबई : परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे अडचणीत आलेल्या अभियंत्यांनी शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असे आश्वासन यावेळी त्यांनी उमेदवारांना दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्यानंतर देखील राज्यातील ८३३ पदवीधर अभियंत्यांवर नोकरी जाण्याची वेळ आली आहे.
परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे अभियंते अडचणीत आले आहे.या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली.
राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे ८३३ उमेदवारांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.या सर्व अडचणीतून मार्ग निघावा व न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या उमेदवारांचे सर्व म्हणणे राज ठाकरेंनी ऐकून या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे  आश्वासन त्यांनी या उमेदवारांना दिले.