एमपीएससी परीक्षेत मंगेश ठोकेचे यश

0

चाळीसगाव । सन 2016 या वर्षी घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत एनटी ‘अ’ संवर्गातुन चाळीसगाव पवारवाडी येथील रहीवासी मंगेश विजयसिंग ठोके हा विद्यार्थी महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाला आहे.

चाळीसगांव येथील पवार वाडी येथे वास्तव्यास असलेले विजयसिंग ठोके जिल्हा परीषद शिक्षक व मनीषा पाटील प्रा शिक्षिका यांचा मंगेश विजयसिंग ठोके चिरंजीव आहे. यशाबद्दल मंगेश ठोके याचा रयत सेने च्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश पवार जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.