पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी 4 हजार 839 उमेदवार पात्र ठरले आहेत. दि. 2 एप्रिलला ही परीक्षा घेण्यात आली होती. आयोगामार्फत संकेतस्थळावर पात्र उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व परीक्षेच्या गुणांचे कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याची मुख्य परीक्षा दि. 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.
प्रवर्गनिहाय कट ऑफ याप्रमाणे असतील : खुला – 189, एससी – 173, एसटी – 148 डीटी (ए) – 180, एनटी (बी) – 184, एसबीसी – 182, एनटी (सी) – 189, एनटी (डी) – 189, ओबीसी – 189