एम्पायर इस्टेटमधील रहिवाश्यांचा शनिवारी मोर्चा

0

चिंचवड : येथील एम्पायर इस्टेटमधील रहिवासी शनिवारी (दि. 17) सकाळी दहा वाजता महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत. एम्पायरमध्ये जो उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे त्यालाच जोडून चढ व उतार पुलाचे काम महापालिकेने सुरु केले आहे. सन 2011 पासून या चढ व उतार पुलाला आपण विरोध केलेला असतानाही हे काम सुरु करण्यात आले आहे. ते काम बंद करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच आपल्या मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात येणार आहे. यासाठी सर्व सर्व सदनिकाधारक, भाडेकरू दुकानदारांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.