‘एम्पायर इस्टेट’ रहिवाशांकडून ‘आनंदवन’ला 1 लाख 48 हजार

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीमधील रहिवाशांकडून चंद्रपूर-वरोरा येथील ‘आनंदवन’च्या कार्यासाठी 1 लाख 48 हजार 403 रुपयांची मदत आली. नगरसेवक शैलेश मोरे यांच्या हस्ते डॉ. विकास आमटे यांना देण्यात आला. एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघ यांचा नववा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 7) एम्पायर इस्टेट विरंगुळा केंद्रात साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे सचिव व चिफ फंक्शनल डॉ. विकास बाबा आमटे, क ौस्तुभ विकास आमटे, ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे निवृत्त केंद्र प्रमुख वा. ना. अभ्यंकर, नगरसेवक शितल शिंदे, रांका ज्वेलर्सचे तेजपाल रांका, अष्टेकर ज्वेलर्स, बांधकाम व्यावसाईक घनशाम अगरवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोरे यांनी केले.