चार तासात आवळल्या मुसक्या ; मुद्देमाल केला हस्तगत
रावेर- शहरातील एम.जे.मार्केटमधील दुकान फोडून माल लंपास करणार्या चोरट्यास रावेर पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील एम.जे.मार्केटमधून 15 मे च्या रात्री चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून सुरज प्रोव्हिजनमधील काजू, बदाम, सिगारेट पाकीट लांबवले हाते तसेच इंडिया क्रिएशन या रेडीमेड दुकानातुन शर्ट, फुलपॅन्ट आदी कपडे चोरून नेले होते. याबाबत रावेर पोलिसात अशोक मूलचंदानी यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चार तासात चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
एम.जे.मार्केट चोरी प्रकरणी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासाचे आदेश कर्मचार्यांना दिले होते. फौजदार नाजीम शेख, पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी, कॉन्स्टेबल भरत सोपे, सोहेल गणेश यांनी अवघ्या चार तासाच्या आत सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ गोंडु कोळी (रा.निंबोल) यास ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली दोन्ही चोर्या आरोपीने केल्याचे उघड झत्तले. दुकानातील साहित्यासह चोरीस गेलेला आठ हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.