एरंडोलला श्रीकृष्णाष्टमी उत्साहात ; चिमुकल्यांच्या वेषभूषेने मिळवली दाद

0

आनंद विहार बालवाडीत विविध कार्यक्रम ; चिमुरड्या श्रेयस देवरेने फोडली दहिहंडी

एरंडोल- शहरातील शारदोपासक महिला मंडळ संचलित आनंद विहार बालवाडी क्रमांक एक व दोनमध्ये श्रीकृष्णाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांनी आकर्षक वेषभूषा परीधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले तर चिमुकल्या श्रेयस देवरेने दहिहंडी फोडली. या कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा रश्मी दंडवते, मनीषा पवार, मनीषा पाठक, नयना महाजन यांच्यासह रत्नाबाई देवरे, निशीगंधा देवरे, रूपाली देवरे आदींची उपस्थिती होती.