एरंडोल तालुक्यातील निवडणुकीत तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत

0

एरंडोल । तालुक्यात एकूण तीन गट व सहा गण आहेत. यात विखरण-रिंगणगाव हा गट तालुक्यात सर्वात मोठा गट आहे या गटात एकूण 32 हजार 609 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तळई-उत्राण गटातून 31 हजार 861 तर कासोदा-अडगाव गटातून 31 हजार 852 आपला मतदानाचा हक्क बजावणार असून एकूण रिंगणात तिन गटात 12 तर सहा गणात 23 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीतून आपले नशीब अजमावणार आहेत.

सहा गणातील उमेदवार रिंगणात याप्रमाणे लढणार
विखरण गणातून कांतीलाल भीमसिंग पाटील राष्ट्रवादी, विवेक जगदीश पाटील शिवसेना, सुभाष रामचंद्र पाटील भाजप प्रमाणे उमेदवार आहे. रिंगणगाव गण मंदा भिका कोळी भाजप, गीत सुनिल बडगुजर राष्ट्रवादी, सुनिता विठ्ठल बडगुजर अपक्ष, रजनी मोहन सोनवणे शिवसेना, उत्राण गण भागवत भिकन पाटील भाजप, गजानन रामदास पाटील राष्ट्रवादी, मयूर राजेंद्र पितृभक्त अपक्ष, अनिल रामदास महाजन शिवसेना, तळई गण माधुरी महेंद्र पाटील भाजप, मालुबाई दशरथ पाटील राष्ट्रवादी, शांताबाई सखाराम महाजन शिवसेना, कासोदा गण मुन्नाबी जमशेरखान राष्ट्रवादी, उषाबाई तुकाराम गादिकर भाजप, रेश्माबी शकीलखान पठाण अपक्ष, लताबाई सुरेश पवार काँग्रेस, पद्मा महेश पांडे शिवसेना, आडगाव गण केशरलाल नारायण ठाकुर काँग्रेस, चंद्रकला दिलीप भिल भाजप, निर्मलाबाई लहू मालचे राष्ट्रवादी, सरस्वती भिका मोरे शिवसेना आपले नशीब अजमावत आहेत.

निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला
या निवडणुकीत एक आजी, माजी आमदार व खासदार यांच्यासह जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे आपलीच सत्ता आणू या हेतूने सर्व नेते कामाला लागले असून याचा फायदा कोणाला होईल व मतदारांना आपल्या बाजूस करण्यास कोण सक्षम होईल हे मात्र 23 फेब्रुवारी रोजी मतदान पेटीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. सद्यातरी भाजप-सेनेचा प्रचार जोरदार असून राष्ट्रवादी काहीशी मागे पडलेली दिसून येत आहे.

तालुक्याच्या लागून असलेल्या म्हसावद बोरनार गटाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येऊन गेले तर राष्ट्रवादीचे अजित पवार, भाजपचे गिरीश महाजन हे नेते प्रचारासाठी तालुक्यात येण्याची पक्षांकडून चर्चा आहे. मुख्यमंत्री व अजित पवार सोडता तालुक्यात वरच्या फळीच्या नेत्यांची प्रचारासाठी येण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच पक्ष अंतर्गत कलह व तिकिटासाठी पक्ष प्रवेश याचा फटका सर्वच पक्षांना बसणार हे मात्र निश्चित.