कासोदा । एरंडोल पं.स. सभापती बापुराव गादीकर, सदस्या शारदा पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने एरंडोल तालुक्यात भाजपाची ताकद वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रवेश करतेवेळी संघटनमंत्री किशोर काळकर, जि.प. सदस्य मच्छिंद्र पाटील, तालुकाध्यक्ष एस.आर. पाटील, माजी तालुकाध्यक्ष भिका कोळी, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेश ठाकरे, नुरुद्दीन मुल्लजी, छोटू क्षिरसागर यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
35 वर्षापासून सेनेत
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा पं.स. चे सभापती तुकाराम उर्फ बापुराव गादीकर सुमारे 35 वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून मतदार संघात परिचित आहे. तर राष्ट्रवादीच्या शारदा पाटील या एकमेव पं.स. सदस्या आहेत. कासोदा गणातून भाजपाने बापुराव गादीकर यांची पत्नी उषाबाई गादीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्राण गणातून शारदा पाटील यांचे पती भागवत पाटील यांना उमेदवारी देऊन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला.