एरंडोल । शासनाच्या सर्व शिक्षा अभियान व समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती रजनी सोनवणे, उपसभापती विवेक पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल महाजन, शांताबाई महाजन, निर्मलाबाई मालचे, रेश्माबी शाकील्खान पठान, माजी सभापती मोहन सोनवणे यांच्याहस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. खेडी येथील गौरव सोनवणे व नरेंद्र सोनवणे या विद्यार्थ्याना रोलेटर,रिंगणगाव येथील गणेश भोई व शुभम भिल या विद्यार्थ्याना व्हीलचेअर,पिंपळकोठासीम येथील जीशान पटेल यास सी.पी.चेअर, तर एरंडोल येथील मोहम्मद कैप शेख काबिरोद्दिन यास लार्ज प्रिंट बुक संच वाटप करण्यात आले.
सर्वांनी दिव्यांगांना सहकार्य करण्याचे आवाहन
यावेळी गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी अपंग व दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाने सहानुभूतीने पाहून सहकार्य करावे असे आवाहन केले अपंग विद्यार्थ्यांनी देखील मनात अपंगत्वाची भीती न बाळगता आत्मविश्वासाने यश प्राप्त करावे असे सांगितले. मंदार वडगावकर यांनी सूत्रसंचालन तर गुरुदास शिंपी यांनी आभार मानले.कार्यक्रमास माजी सभापती दिलीप रोकडे,गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी,शालेय पोषण अधिक्षक प्रशांत गायकवाड,शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.एच.पाटील यांचेसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भीमराव भालेराव, सुनीता डहाके, विजय बडगुजर, युवराज पाटील, दत्तात्रय पवार, अर्विन कडू, योगेश कुबडे, हर्शल पाटील यांनी सहकार्य केले.