एरंडोल। न गरपालिकेच्या पाच घंटागाड्यांचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, प्रा.जी.आर. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अमळनेर दरवाजा व जोहरी गल्ली येथे बांधण्यात येणार्या नवीन शौचालयांचे भूमिपूजन करण्यात आले. नगर पालिकेतर्फे शहरातील केरकचरा जमा करण्यासाठी पाच घंटगाड्या आणण्यात आल्या असुन शहरातील घाणीची व कचर्याची समस्या यामुळे सुटण्यास मदत होईल. तसेच शासनाच्या स्वच्छता अभियान अंतर्गत जोहरी गल्ली येथे बांधण्यात येणार्या सार्वजनिक शौचालयांचे भूमिपूजन नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी व नगरसेविका जयश्री पाटील यांच्याहस्ते तर अमळनेर दरवाजा येथे बांधण्यात येणार्या शौचालयांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
नवीन आणि सर्व सोयीनीयुक्त अद्ययावत बांधकाम करण्यात येणार
अमळनेर दरवाजा व जोहरी गल्ली येथील जीर्ण झालेले संडास पालिकेने पाडले असुन या ठिकाणी नवीन आणि सर्व सोयीनीयुक्त अद्ययावत बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. नवीन बांधण्यात येणार्या शौचालयांचे बांधकाम लवकर पूर्ण करावे अशी मागणी परीसरातील महिलांनी केली आहे यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पालिकेतर्फे शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी देखील घरातील केरकचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीत टाकावा असे आवाहन केले. कार्यक्रमास मुख्याधिकारी विशाखा मोटघरे, नगरसेवक बबलू चौधरी, नितीन महाजन, राजेंद्र शिंदे, डॉ. नरेंद्र पाटील, बांधकाम अभियंता पंकज पन्हाळे, आनंद दाभाडे यांचेसह पालिका कर्मचारी, परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मान्यवरांची होती उपस्थिती
एरंडोल येथे घंटागाडीचे लोकार्पण करतांना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत. तसेच माजी नगराध्यक्ष देविदास महाजन त्यांचे समवेत नगराध्यक्ष रमेश परदेशी व पदाधिकारी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सरलाबाई पाटील, नगरसेविका हर्षाली महाजन, उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम, प्राचार्य डॉ.ए.आर. पाटील. अभिजित पाटील, योगेश महाजन, असलम पिंजारी, कृणाल महाजन, दर्शना ठाकूर, आरती महाजन, डॉ. सुरेश पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, छाया दाभाडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कचरा घंटागाडीत टाकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.