एलईडी बल्बमुळे 20 हजार कोटींची बचत

0

नवी दिल्ली । ऊर्जा बचतीसाठी वापरण्यात येणार्‍या एलईडी बल्बच्या वापरामुळे वीज बिलात सुमारे 20 हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत दिली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला गोयल उत्तर देत होते.

ज्या राज्यांमध्ये पवन ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करणारे प्रकल्प नाहीत. अशा राज्यांना पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास स्वच्छ ऊर्जेसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंडळाकडून प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिहार, दिल्ली आणि दादरा नगर हवेली यांसारख्या राज्यांनी पवन ऊर्जेच्या माध्यमातून तयार होणारी वीज खरेदी करण्यास पसंती दर्शवली असल्याची माहिती त्यांनी दिली. फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात पवन ऊर्जेच्या माध्यमातून तयार होणार्‍या वीजेला 3.46 रुपये प्रती युनिट दर मिळाल्यामुळे या ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याला प्रोत्साहन मिळणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले.