एलसीबी शिस्तप्रिय पोलिस निरीक्षक नजन-पाटलांकडेच : धूरा सांभाळली

Kisanrao Najan-Patil Again As Police Inspector of Jalgaon LCB : Assumed Charge जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पायउतार होवून निलंबित व्हावे लागले तसेच त्यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे एलसीबीच्या प्रभारी निरीक्षकपदाची धुरा पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर पोलिस अधीक्षकांचे आदेश 24 तासात आयजींनी फिरवल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती मात्र आता पुन्हा नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपवण्यात आली असून गुरुवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकार्‍याकडे एलसीबीची धूरा आल्याने सर्व जनतेतून कौतुक होत आहे.

रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला मिळावी गती
जळगाव गुन्हे शाखेतील अंतर्गत राजकारण, व्हायरल झालेली रेकॉर्डींग यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. आता नजन-पाटील यांच्या रूपाने अत्यंत शिस्तप्रिय अधिकार्‍याकडे पदभार आल्यानंतर रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासह दुचाकी, घरफोडी, चोरी तसेच अन्य प्रलंबित गुन्ह्यांची उकल होण्याची सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.

निरीक्षक नजन-पाटलांनी स्वीकारला पदभार
स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी पीआय म्हणून नियुक्ती झालेले पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले होते परंतू नंतर या आदेशाला आयजी बी.जी.शेखर यांनी स्थगिती दिली होती परंतु बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार देण्याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक मुंढे यांनी काढले असून गुरुवारी सकाळी नजन पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. पाचोरा पोलीस स्थानकाचा पदभार आता दुय्यम अधिकारी पुढील आदेश होईपर्यंत सांभाळणार आहेत.