एसआरटी पद्धतीने भात लागवड

0

शिरगाव- येथील युवा व प्रयोगशील शेतकरी प्रवीण साहेबराव गोपाळे यांनी एस आर टी तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड करण्याचा आगळावेगळा प्रयोग केला आहे. गोपाळे यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भात लागवड केली तर दरवर्षी लागणार्‍या खर्चा पेक्षा 50 टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपारिक लागवडीपेक्षा जास्त येते. शिवाय पिकांची रोग प्रतिकार शक्ती जास्त असते. सर्वात महत्वाचे म्हणजे उगवणशक्ती प्रचंड चांगली राहत असल्याने दुबार पेरणीचा त्रास वाचतो. पिकांचा रंग आणि जमिनीचा पोत चांगला राखता येतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा.