एसएनबीपी स्कूलमध्ये मिनी क्रिकेट मैदान

0

क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी-चिंचवड : बॉलिंग मशिनची सुविधा मोठ्या क्रिकेट ऍकॅडमीमध्ये उपलब्ध असते, मात्र आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ही अद्यावत सुविधा दिली आहे व तोच आमचा संकल्प आहे, असे मत एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डी. के. भोसले यांनी व्यक्त केले. रहाटणी येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे मिनीक्रिकेट मैदानाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहीत शर्मा याच्या हस्ते गुरूवारी झाले.

बॉल मशिनची सुविधा योग्य
शर्मा म्हणाला, अद्यावत सुविधा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे बघून मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या काळात मला विविध मैदानावर जाऊन फलंदाजीचा सराव करावा लागला. बॉलिंग मशिन सारखी सुविधा असल्यामुळे खेळाडूंना विविध गतीने येणार्‍या चेंडूंचा सराव करता येणार आहे. यामुळे चांगला फलंदाज तयार होण्यास मदत होईल.

तेंडुलकर, धोनी, कोहली घडावेत
भोसले म्हणाले, एसएनबीपी शाळेने खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे व शाळा विविध कार्यक्रम आयोजित करते. शाळेतील सुविधांचा वापर करून येथेच खेळाडूंचा पाया तयार करता येणार आहे. यातूनच आपल्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहीत शर्मा किंवा विराट कोहली सारखे खेळाडू मिळणार आहेत.