एसएसबीटी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

0

जळगाव । नुकताच 4 जून रोजी एमएचटीसीईटी-2017 चा निकाल जाहिर झाला असून 5 जून पासुन प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया झाली आहे. ही प्रेवश प्रक्रिशस रजिस्ट्रेशन 17 जूनपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे समन्वयत प्रा. कृष्णा श्रीवास्तव यांनी दिली. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी गेल्या वर्षापासुन महाराष्ट्र शासनाने नवीन नियमावली लागु असून या वर्षी सुद्धा लागु असल्याची माहिती यावेळी श्रीवास्तव यांनी सांगितले. जे विद्यार्थी 5 ते 17 जून या कालावधीत रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत ते 10 ऑगस्ट पर्यंत एफसीला जाऊन रजिस्टर करू शकतात. मात्र असे विद्यार्थी कॅप राऊंडसाठी पात्र ठरणार नाहीत. त्यांना केवळ संस्था-स्तरावरील (मॅनेजमेन्ट कोटा) जागांसाठीच प्रवेश मिळू शकतो. आपल्या परीसरातील सोसायटीतील, मित्र-परीवारातील, ओळखीतील कोणी 12 पास झाले असतील आणि अभियांत्रिकी प्रवेश घेऊ इच्छीत असतील तर ही माहिती पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया याप्रमाणे राबविणार
नोंदणी 5 ते 17 जून पर्यंत फॅशीलेटिशन सेन्टर करता येणार, 19 जून रोजी गुणवत्ता यादी, 20 ते 21 जून गुणवत्ता यादीबद्दलचे आक्षेप नोंदविणे, 22 जून रोजी अंतीम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 23 ते 26 जून दरम्यान विद्यार्थ्याने कॅप-1 राऊंडसाठी आपापले पसंतीक्रम स्वतःच्या लॉगीनमधुन भरुन निश्‍चिती करणे, 28 जून रोजी विद्यार्थ्यांना कॅप-1 मधे मिळालेल्या जागा प्रकाशीत, मिळालेली जागा स्वीकारायची असल्यास अ‍ॅडमिशन रिर्पोटींग सेन्टर (एआरसी) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन रीपोर्ट करणे व जागा स्वीकारणे. 5 जुलै रोजी कॅप-2 साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत, 5 ते 8 जुलै विद्यार्थ्याने कॅप-2 राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या लॉगीनमधुन भरुन कनफॉर्म करणे, 10 जुलै रोजी विद्यार्थ्यांना कॅप-2 मधे मिळालेल्या जागा प्रकाशीत, जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच जागा मिळाली असेल, तर अ‍ॅडमिशन रिर्पोटींग सेन्टर (एआरसी) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन रीपोर्ट करणे व मिळालेली जागा स्वीकारायची असल्यास जागा स्वीकारणे, 16 जुलै रोजी कॅप-3 साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत, 16 ते 19 जुलै रोजी आधी मिळालेली आणि एआरसीला जाऊन स्वीकारलेली जागा बदलणे तसेच कॅव-3 राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या लॉगईनमधुन भरुन कन्फार्म करणे, 21 जुलै रोजी विद्यार्थ्यांना कॅप-3 मिळालेल्या जागा प्रकाशीत, जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच जागा मिळाली असेल, तर अ‍ॅडमिशन रिर्पोटींग सेन्टर (एआरसी)ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन रीपोर्ट करणे व जागा स्वीकारणे. ज्या कॉलेजला जागा मिळालेली असेल त्या कॉलेजला जाणे, कागदपत्रे आणि बाकी शिक्षण शुल्क जमा करून आपला प्रवेश निश्चित करणे.