एसटीच्या दरात आज मध्यरात्रीपासून हंगामी दहा टक्के भाडेवाढ

0

मुंबई : एसटीच्या तिकीट दरात आज मध्यरात्रीपासून 20 नोव्हेंबरपर्यंत हंगामी दहा टक्के भाडेवाढ होणार आहे. दिवाळीच्या काळात गावी जाण्याची इच्छा असणा-यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. १ ते २० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच वीस दिवसांसाठी ही भाडेवाढ होणार आहे.

एसटीच्या दरापेक्षा दिडपट दरवाढ करण्याची मुभा खासगी ट्रॅव्हल्सना असल्याने, सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्सच्या दरात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्ते मार्गाने प्रवास करताना एसटी व खासगी ट्रॅव्हल्स यापैकी कोणताही पर्याय स्वीकारला तरी दरवाढीस सामोरे जावे लागणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटीकडून ही भाडेवाढ करण्यात येते. तर खासगी ट्रॅव्हल्सवाले या काळात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारतात. त्यामुळे प्रवाशांना ऐन दिवाळीत या दरवाढीचा सामना करावा लागतो.