कारवाईला कामगार न्यायालयाकडून स्थगिती
जळगाव: एसटी कर्मचार्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षा कमी करणे अथवा त्या रद्द करून देण्याच्या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन महामंडळाने चौकशीअंती 8 कर्मचार्यांना बडतर्फीची नोटीस बजावली आहे. या कारवाईस संबंधितांनी जिल्हा कामगार न्यायालयात आव्हान दिले असून, कारवाईला स्थगिती मिळाली आहे.
महामंडळ प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात अपिल करण्याची संधी 2018 मध्ये 120 कर्मचार्यांना देण्यात आली होती. या अपिलाच्या माध्यमातून कारवाईचे स्वरुप सौम्य करून घेण्यासाठी अथवा त्या स्थगित करून घेण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. त्याआधारे चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठ जणांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.