जळगाव- एसडी-सीडतर्फे ‘स्मार्ट गर्ल’ याविषयावर नंदिनीबाई वामनराव मुलींचे माध्यमिक विद्यालयात शिबिर झाले. यात ७५ विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या हाेत्या. शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक रत्नाकर महाजन (हिंगोली) यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दोन दिवसीय शिबिराला मुख्याध्यापिका चारुलता पाटील, समन्वयक प्रवीण सोनवणे उपस्थित होते. शिबिरात महाजन यांनी दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा, संवादाचा अभाव, मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम, मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत, वैवाहिक जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव, आंतरजातीय विवाह, घटस्फाेटाची वाढती संख्या, मोबाइल व इंटरनेटचा वाढता प्रभाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले.