जळगाव । दरवर्षीप्रमाणे यंदाही एसडी सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेमार्फत दिल्या जाणार्या मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता कांताई हॉल, नविन बसस्थानकामागे पुण्यातील चाकण्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थितीत होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.
10 वर्षापासून ज्ञानयज्ञ
सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेमार्फत जळगाव जिल्ह्यातील गरवंत, होतकरू, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक व उद्याजकीय कौशल्य विकासित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षण बनविणे हा उद्देश डोळयासमोर ठेवून तसेच त्यांना उच्च शिक्षण घेतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये यासाठी मातोश्री प्रेमाबाई भिकनचंद जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती रूपाने दहा वर्षापासून ज्ञानयज्ञ ज्योत आजही कायम ठेवण्यात आली आहे. तरी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, साहित्यिक, विद्यार्थी चळवळीशील संबंधीत असणारे मान्यवरांनी शिष्यवृत्ती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्ष मिनाक्षी जैन, गव्हर्निंग बॉडी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे. या शिष्यवृत्ती वाटपाच्या वितरण सोहळ्यास उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्थेतर्फे शिष्यवृत्तीधारक व त्यांचे पालकांना करण्यात आले आहे.