एसबीआयची ऑनलाईन सेवा बंद

0

नवी दिल्ली: स्टेट बँकेची ऑनलाईन सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या दोन तासांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे बंद पडले आहे. बँकेने ट्विट करून याची माहिती देत होणाऱ्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केले आहे. फक्त एटीएम आणि पीओएस सेवा सुरु असल्याने एटीएमसमोर लांब रांगा लागल्या आहे. लवकरच सेवा पुन्हा सुरु केली जाईल असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक आहे. भारतीय स्टेट बँकेकडे जवळपास 44 कोटी ग्राहक आहेत. या बँकेची देशभरात जवलपास 24 हजार शाखा आहेत. त्यामुळे सेवा खंडित होणे मोठा तापदायक प्रकार आहे.