शेंदुर्णी (विलास अहिरे) । येथील मुख्य व्यापारीपेठ व करोडो रुपयाची उलाढाल असलेल्या येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांनी विभागीय कार्यालयाचे आदेश येताच पारंपारिक पद्धतीने होत असलेले बँकेतील पेपर व्यवहार मिनिटांचाही उशीर न करता पेपर लेस करण्यासाठी शाखेतील चाळीस हजाराहून कमीचे पैसे भरणा व खात्यातील पैसे काढण्याचे पावतीद्वारे, चेकबुक, स्लीपद्वारे होणारे व्यवहार नाकारले व एटीएम कार्ड द्वारेच व्यवहार करण्यासाठी सक्ती करण्यात आल्याने बुधवारी बाजारहाटसाठी आलेल्या आजूबाजूच्या परिसरातील खेड्यापाड्यातुन बँकेत आलेल्या ग्राहकांचा या विषयावर गोंधळ उडाला. कारण यापुढे भारतीय स्टेट बँक व्यवहार हे एटीएम कार्ड द्वारे करणे सक्तीचे होणार आसल्याची कोणतीही पुर्वसुचना ग्राहकांना एसएमएस द्वारे बँकेच्या वतीने दिली गेली नसतांना तसेच अशिक्षित ग्राहकांना डिजिटल व्यवहार कसा करावा यासाठी बँकेचे वतीने बँक मित्र नेमला नसतांनाही डिजिटल व्यवहाराची सक्ती करणे चुकीचे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते.
बँकेत आधीच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही
काउंटर संख्या कमी आहे त्यामुळे ग्राहकाना किरकोळ कामांसाठी तासनतास वेळ वाया घालावा लागतो.तसेच प्रत्येक सेवेसाठी बँक अतिरिक शुल्क आकारणी करते,तसेच ग्रामीण भागातील शाखा असतांनाही सर्वच खातेदारांना खाते खोल्याण्यासाठी तब्बल दोन ह्जार रुपये जमा ठेवावे लागतात, तसेच कमीत कमी दोन हजार रूपये खात्यात शिल्लक न ठेवर्या खातेदारांना मासिक 60 रूपये आकारणी करण्यात येते. ग्राहकांची कोणतीही चुक नसतांना दंड आकारणे, नोटा मोजनी शुल्क एक लाखाला 75 रूपये सक्तीने परस्पर खात्यातून वसूल करण्यात येतात. खाजगी बँका स्पर्धेच्या युगात सरकारी बॅका पेक्षा 3 तास जास्त सेवा देतात, त्यामानाने सरकारी बँकामध्ये कर्मचारी वर्ग कमी सेवा देऊनही ग्राहकांवर चिडचिड करतात, त्यामुळे खातेदारांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते व संताप व्यक्त केला जातो, वरिष्ठांनी बँकेत, शाखांना भेटी देत परिस्थिनीवर नियत्रंण आणावे, एटीएम मध्ये व बँकेत दैनंदिन व्यहवारासाठी पुरेशी रोकड उपलब्ध करावी, बँकेच्या ग्राहकांना बँकेत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जावी सर्व सुविधा उच्च दर्जेदार असाव्यात अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत
अजून दोन दिवस जुनी पध्दत राहणार
शाखाधिकारी अविनाश पगारे यांनी डिजीटल व्यवहार सोपा करून सांगतानाच, ग्राहकांनी गोंधळुन जाऊ नये असे आवाहन केले. कॅश काऊटरजवळ आल्यावर स्पाइस मशिनमध्ये एटीएम कार्ड स्वाइप करावे, पैसे भरण्याचा काढण्याचा वा इतर पर्याय निवडावा, आवश्यक रक्कम टाईप करावी लगेचच कॅशियर कडुन रक्कम स्विकारावी अथवा जमा करावी. यात चेकची किंवा स्लिपची आवश्यकता नाही ,खाते नंबर लिहण्याची गरज नाही. पारंपारिक पद्धतीने व्यवहार करण्यासाठी अजुन दोन दिवस मुभा राहील. देश डिजीटल होत असुन त्यात मागे राहू नये, त्यादृष्टीने आम्ही पावले उचलत आहेत, नवीन पध्दती शिकविण्याची जबाबदारी बँकेची नाही.असे जिल्हा व्यवस्थापक कृष्णा करंदीकर यांनी सांगितले.