स्थापत्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल
पिंपरीः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे सेंटरचे माजी अध्यक्ष व जनरल कौन्सिलचे सभासद आणि मे.जी.बी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलजी प्रा.लि.चे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी यांना स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल एसीसीई(आय) या गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्तुंग जीवन कार्याबद्दल असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनिअर्स (एसीसीईआय) यांच्यातर्फे एसीसीआय गौरव पुरस्कार 2018 या प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्काराने मदुराई येथे फाउंडेशन डे निमित्त आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. एन. वेदाचलम, माजी संचालक एलपीएससी, इस्त्रो, प्रसिद्ध प्राध्यापक, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, त्रिवेंद्रम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ऑल इंडिया प्रेसिंडेंट, एसीसी(आय) एस. रत्नावेल, अवॉर्ड कमिटी चेअरमन डॉ. अजित सबनिस प्रोग्रॅम कमिटी संचालक इंजि. एस.पी.श्रीनिवासन, सेके्रटरी जनरल, एसीसी(आय) चंद्रा मौलिस्वर, प्रो. डॉ. अरुणाचलम, चेअरमन, एसीसीई(आय) मदुराई सेंटर हे उपस्थित होते.