एसी बंद पडल्याने भुसावळात गीतांजली एक्स्प्रेस रोखली

0

रेल्वे प्रवासी संतप्त ; तासभर रेल्वे स्थानकावर गाडीचा खोळंबा

भुसावळ- डाऊन 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसच्या बी- 2 डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने संतप्त रेल्वे प्रवाशांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर तासभर गाडी रोखून धरण संताप व्यक्त केला. पर्यायी डबा जोडण्याची मागणी करण्यात आली मात्र भुसावळात कोच नसल्याने एसी दुरुस्त करण्यासाठी तीन टेक्नीशीयन पाठवण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर प्रवासी शांत झाले. सोमवारी दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी आलेली एक्स्प्रेस दुपारी 2.19 वाजता नागपूरकडे रवाना झाली.

एसी बंद पडल्याने प्रवासी संतप्त
12859 डाऊन गीतांजली एक्स्प्रेसमधील बी- 2 या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानंतर संतप्त प्रवाशांनी भुसावळ स्थानकावर सोमवारी दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी आल्यानंतर गाडी पुढे जावू न देण्याचा निर्धार करीत तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांच्या या पावित्र्यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. स्टेशन संचालक जी.के.अय्यर, ए.ई.जनरल भगत, एसीएम अजयकुमार, एएससी राजीव दीक्षीत, सिनी.डीएनई रामचंद्रन यांनी धाव घेत प्रवाशांची समजूत काढली मात्र प्रवासी ऐकण्यास तयार नसल्याने अखेर रेल्वे प्रवाशांच्या तिकीटावर एसी नादुरूस्त असल्याचे लिहून देण्यात आले शिवाय ए.सी.दुरुस्त करणारे तीन टेक्नीशीयन पाठवण्यात आल्यानंतर रेल्वे प्रवाशी शांत झाले. दुपारी दोन वाजून 19 मिनिटांनी गाडी नागपूरकडे रवाना झाली.