शिरपूर/धुळे । धुळे येथील एस.व्ही.के.एम. इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष बी. फार्मसी परिक्षेत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला असून प्रथम वर्षातील निकिता पाटील हिने 8.45 सीजीपीए गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्ञा जैन 8.37, प्रज्वल निकम 8.30, पायल गजघाटे 8.22 व हितेश पाटील 8.19 यांनी अनुक्रमे दुसरा,तिसरा,चौथा व पाचवा क्रमांक पटकावत बाजी मारली.
आ.अमरिशभाई पटेल यांनी दिल्या शुभेच्छा
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, विश्वस्त राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ. समीर गोयल यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. समीर गोयल व सर्व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशाचे श्रेय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, येथे आत्मसात केलेली शिक्षण पध्दती तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना दिले. तसेच शिक्षकांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन व येथे कार्यरत असलेल्या सुनियोजित शैक्षणिक कार्यपद्धती बद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.