रायगड । रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड विकासाच्या कामांना गती द्यावी. किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धनाची कामे करताना ती भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीत व खबरदारी बाळगून करावीत, असे निर्देश रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, निमंत्रित सदस्य रघुजीराजे आग्रे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच प्राधिकरण समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखड्याचा आढावा घेतला तसेच प्राधिकरणातील संबंधित अधिकार्यांना किल्ले रायगड आणि परिसर विकासाची कामे करताना कोणात्या तांत्रिक अडचणी येतात याची माहिती करुन घेतली. अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता, ई-निविदा याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाकडे कोणते प्रस्ताव प्रलंबित असतील तर त्याचा पाठपुरावा करून मान्यता घेण्यात यावी. आराखड्यातील प्रस्तावित केलेल्या कामांचे वर्गीकरण करुन भारतीय पुरातत्व विभाग व विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला यांनी त्यांना सोपविलेली कामे करावीत. यावेळी त्यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखड्याचा आढावा घेतला तसेच प्राधिकरणातील संबंधित अधिकार्यांना किल्ले रायगड आणि परिसर विकासाची कामे करताना कोणात्या तांत्रिक अडचणी येतात याची माहिती करून घेतली. अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता, ई-निविदा याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. आराखड्यातील प्रस्तावित केलेल्या कामांचे वर्गीकरण करून भारतीय पुरातत्व विभाग व विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला यांनी त्यांना सोपवलेली कामे करावीत.