ऐनपूरच्या पिता-पूत्रांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

0

अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या चालकाची जामिनावर सुटका

भुसावळ- ओव्हरटेकच्या प्रयत्नात चारचाकीने उडवल्याने चेतन रवींद्र जैतकर (04) व त्याचे पित रवींद्र नारायण जैतकर (40, दोन्ही रा.ऐनपूर) यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला होता. या प्रकरणी चारचाकी चालक रामचंद्र चिंतामण सोनवणे (33, दीपनगर) यास बुधवारी रात्री वरणगाव पोलिसांनी अटक केली होती. गुरूवारी त्यास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, अपघातात मयत झालेल्या दोघाही पिता-पूत्रांवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघात
बोहर्डी फाट्याजवळ बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास ऐनपूरचे रहिवासी असलेले रवींद्र जैतकर, त्यांचा चार वर्षीय मुलगा चेतन व त्यांचे साडू प्रभाकर कोळी हे बुधवारी दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.3687) ने येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात चारचाकी (एम.एच.31 सी.एन.9977) ने धडक दिल्याने चेतन व त्याचे वडील रवींद्र यांचा मृतयू झाला होता प्रभाकर कोळी हे जखमी झाले होते. या प्रकरणी वरणगाव पोलिसात विजय नारायण जैतकर (33, ऐनपूर, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र सोनवणे (दीपनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.