ऐनपूरच्या मातेचा अतिरक्तस्त्रावाने तर प्रसुतीदरम्यान बाळाचाही मृत्यू

0

दुर्दैवी घटनेने हळहळ : गर्भातच बाळाला झाली काविळची लागण

रावेर- तालुक्यातील ऐनपूर येथील 20 वर्षीय विवाहितेचा प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला तर गर्भावस्थेतच बाळालादेखील काविळ झाल्याने बाळही दगावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. ऐनपूर येथील रहिवासी भुरीबाई नंदु भील (20, मूळ रा.शाहपूर, मध्यप्रदेश) या प्रसुत झाल्यानंतर गर्भावस्थेतच बाळाला काविळ झाल्याने बाळाचा शहापूर येथे मृत्यू झाला तर पतीने भुरीबाई यांना राहत्या घरी ऐनपूर येथे आणले मात्र रात्री अचानक पोट दुखायला लागले व अतिरक्तस्राव सुरू झाला. सोमवारी सायंकाळी या विवाहितेला रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणत असतांना तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी तपासणी करून मृत घोषित केले. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून ती निंभोरा पोलिसात वर्ग करण्यात आली.