ऐन उत्सवात प्रवाशांची गैरसोय : छत्तीसगडमधील कामांमुळे रेल्वेचा ब्लॉक

Railway Block : 36 trains Cancelled भुसावळ : छत्तीसगडमधील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील बिलासपूर विभागातील इंगुर स्टेशन ते रायगड झारसीगुडा सेक्शनमध्ये रेल्वेच्या चौथ्या लाईनीचे काम सुरू होत असल्याने भुसावळ विभागातून त्या भागात धावणार्‍या तब्बल 36 रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. ऐन उत्सवात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना पर्यायी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे अथवा अन्य गाड्यांचे आरक्षण करावे लागणार असल्याने रेल्वेच्या कार्यपद्धत्तीविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

अचानक रेल्वे गाड्या रद्दमुळे गैरसोय
भारतीय रेल्वेत मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रशासनाकडून विविध कामे काढली जात आहे. यामुळे पूर्व नियोजित रेल्वे गाड्यांचे आरक्षण असल्यावर त्यांचे ते रद्द होत आहे. यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांनी तीन ते चार महिने अगोदरच रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले असल्याने व ते अचानक रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेझोनमधील बिलासपूर विभागात चौथ्या लाईनीचे काम सुरू असल्याने 20 ते 30 ऑगस्ट दरम्यान भुसावळ विभागातून पुणे, मुंबई, अमदाबादकडे जाणार्‍या 36 रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहे.

रद्द झालेल्या गाड्या अश्या
संत्रागाची -पुणे (20 व 27) , पुणे -संत्रागाची (ि22 व 29), शालीमार पोरबंदर (26 व 27), पोरबंदर-शालीमार (24 व 25), पुरी-जोधपूर (24), जोधपूर पुरी (27) , शालीमार – ओखा (23 व 30), ओखा-शालीमार (21 व 28), मालदाटाऊन-सुरत (20 व 27), सूरत-मालदा टाऊन (22 व 29), हावडा पुणे-हावडा (दोन्ही बाजूची 21 व 28), संत्रागाची पोरबंदर (28), पोरबंदर संत्रागाची (26), संत्रागाची एलटीटी (26 व 27), एलटीटी संत्रागाची (24 व 25), भुवनेश्वर-एलटीटी (22, 25, 29), एलटीटी भुवनेश्वर (24, 27 व 31), हटीया-एलटीटी (26, 27), एलटीटी हटिया (28 व 29), हावडा शिर्डी साईनगर (25), साईनगर शिर्डी हावडा (27), हावडा मुंबई (26), मुंबई हावडा (28), एलटीटी कामाख्य (20 व 27), कामाख्य एलटीटी (दि. 23 व 30), हावडा मुंबई मेल (21 ते 28 आठ दिवस), मुंबई हावडा मेल (21 ते 28 आठ दिवस), अहमदाबाद हावडा , हावडा अहमदाबाद, शालिमार-एलटीटी व एलटीटी शालीमार या गाड्या ( 21 ते 28 रद्द आहे.), हावडा पुणे (20, 25, 27), पुणे हावडा (22, 27 व 29), हावडा-मुंबई (22, 23, 24 व 26), मुंबई हावडा (23,24,25 व 28) , हटीया-पुणे (22, 26 व 29), पुणे हटिया (24, 28 व 31) आदी गाड्या रद्द झाल्या आहेत.