यवत । कुरकुंभ (ता. दौंड) येथिल औद्योगिक वसाहतीतील ऑनर लॅब, ए 88 या कंपनीच्या विरोधात आठ ते नऊ कामगारांनी बुधवार पासून रोजी कुरकुंभ औद्योगिक वसाहत चौकात चक्री उपोषण सुरू केले आहे. संबंधित कंपनीने गेल्या चार वर्षापासून या कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेतो असे सांगीतले आहे परंतु कंपनी व्यवस्थापनांनी त्यांना कायमस्वरूपी केले नाही.
तसेच चार वर्षाचा पीएफ ही दिला नाही. कंपनीने चार वर्षापासून आमच्यावर अन्याय केला असल्याचा दावा संबंधित कामगार करीत आहेत. या कंपनीने केलेल्या अन्याया विरोधात कामगार न्यायालय पुणे येथे केस चालू आहे. कामगारांच्या उपोषणाला दोन दिवस उलटूनही कंपनीच्या अधिकार्यांनी कामगारांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. या संदर्भात कंपनी व्यवस्थापनची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
स्थानिक विस्थापित कामगारांना कामावर घेणे. कामगारांचा चार वर्षांपासूनचा पीएफ , ईएसआय, व बोनस देणे, तसेच कामगारांना समानतेची वागणूक देणे. स्थानिक कामगारांना चार वर्षे राबून घेतले त्यांना परत कामावर कायमस्वरूपी करून घेणे. अशा मागण्या कामगारांनी केल्या आहेत