नवी मुंबई :- इंटरनेटद्वारे ऑनलाइन वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.ऑनलाइन वेबसाईट वर जाहिरात करून हे दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून वेश्याव्यवसाय चालवत आहेत तर यांचे अजून काही रैकेट नवी मुंबईत कार्यरत आहे का पोलीस याचा शोध घेत आहेत.
राजेशकुमार मुन्ना यादव (२३) व धिरेंद्रकुमार परमेश्वर यादव (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.ऑनलाइन वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी गुगल संकेतस्थळावर जाऊन Navi Mumbai Escort servies या वेबसाईट ची माहिती घेतली.तर त्यावेळी KAJAL Escort Navi Mumabi /Locanto TM Dating in Navi Mumabi या दोघांच्या जाहिराती आढळून आल्या.यातील एकाला संपर्क केला असता त्यांनी तुम्हाला वेश्यागमनासाठी महिला व मुली मिळतील असे सांगितले.त्यावर पोलिसांनी युवा सह्योह संस्थान या संस्थेच्या मदतीने एका बनावट ग्राहकाला तयार करत त्याला या भामट्यांच्या संपर्कात ठेवले.सदर बनावट ग्राहकाने वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली असता त्याला वाशी सेक्टर १० मनपा रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बोलवण्यात आले.ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी वरील दोघे जन बनावट ग्राहकास महिला दाखवण्यासाठी घेऊन आले असता त्यांनी त्यावेळी पहिले पैशाची बोलणी केली २००० रुपयांचा मोबदला देण्याचे ठरले असता बनावट ग्राहकाने ते मान्य केले आणि व्यवहार केला.त्याचवेळी पोलिसांना खात्री पटली असता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अधिकाऱ्यांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले आणि वेश्यागमनासाठी आलेल्या तिघा महिलांची सुटका केली.या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.